World Jackfruit Day 2024 : आज जागतिक फणस दिवस ; हे आहेत काटेरी पण गोड फणसाचे फायदे

Team Agrowon

वरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ लगेच डोळ्यांसमोर येते. अनेक पोषक घटकांनी युक्त पण वजनाला जास्त, कापायला अवघड, हाताळायला जिकरीचे आणि ठरावीक भागातच येणारे हे फळ आरोग्यासाठी खूप लाभदायी असते.

World Jackfruit Day 2024 | Agrowon

कापा प्रकारच्या फणसातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर असतात. बरका प्रकारातील फणसांचे गरे नरम, बिळबिळीत, चवीला कमी गोड किंवा सपक असतात.

World Jackfruit Day 2024 | Agrowon

कापा फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते तर बरका फणसावरील काटे आखूड व पसरट असतात.

World Jackfruit Day 2024 | Agrowon

फणसाची मूळे, साल, फळाचा गर, बी या सर्वांचेच विशेष पोषक आणि आरोग्यवर्धक महत्त्व आहे. या फळाचे सर्वच भाग उपयोगी असतात.

World Jackfruit Day 2024 | Agrowon

पिकलेल्या फणसात सुमारे ६३ ते ७० टक्क्यांपर्यंत जलांश असतो. पोषणमूल्याच्या दृष्टीने १०.५ टक्के ते १३.५ टक्के प्रथिने, २२ ते २५ टक्के कर्बोदके त्यातील सुमारे १४ टक्क्यांपर्यंत शर्करा असून अत्यंत कमी ०.०९ ते ०.१२ टक्के स्निग्धांश असतात.

World Jackfruit Day 2024 | Agrowon

पोटॅशिअम, सोडिअम, कॅल्शिअम, झिंक आणि लोह ही महत्त्वपूर्ण खनिजे त्याचसोबत जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात.

World Jackfruit Day 2024 | Agrowon

फणसाचे पिकलेले गरे खाल्ले जातात. त्यापासून जॅम, जेली, लोणची व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळ्या फणसाची भाजी केली जाते.

World Jackfruit Day 2024 | Agrowon
आणखी पाहा...