Mahesh Gaikwad
आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक करताना कांदा हा वापरतातच. काही लोक जेवण करताना आवडीने कच्चा कांदा खातात.
अनेकांना कच्चा कांदा खायला आवडतो तर काही तोंडाचा वास येतो म्हणून कच्चा कांदा खाणे टाळतात.
स्वयंपाक करताना एखाद्या भाजीमध्ये कांदा घातल्याने त्या भाजीची चव अधिकच वाढते. पण आरोग्याच्या दृष्टीने कांदा खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
कच्चा कांदा खाल्ल्यामुळे केसांपासून यकृत आणि आतडे निरोगी राहतात. त्यामुळे कच्चा कांदा खाल्ल्यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.
कांद्यामध्ये सल्फर, झिंक कंपाउंड आणि बायोअॅक्टिव्ह घटक असतात. कच्चा कांदा खाल्ल्याने लिव्हर सेल्सच्या कार्यामध्ये गती येते.
याशिवाय कच्चा कांदा फॅटी लिव्हर अॅसिडची समस्या नियंत्रित करते. तसेच कच्चा कांद्यातील बायोअॅक्टिव्ह कंपाउंड्स शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलही कमी करते.
तसेच कांदा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. आतड्यांच्या समस्यांसाठीही कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरू शकते.