Roshan Talape
वजन कमी करण्यासाठी तसेच शरीराला स्लिम फिट ठेवण्यासाठी कमी कॅलरी असलेल्या भाज्या आणि त्यांचे फायदे काय आहेत ते पाहूयात.
भेंडीमध्ये फायबर जास्त असून, पचन सुधारते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
काकडीमध्ये पाणी जास्त आणि कॅलरी कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच काकडी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि पचनक्रियाही सुधारण्यास मदत करते.
दोडका अनेक पोषणद्रव्यांनी भरलेला असल्याने फॅट आणि वजन कमी करण्यास मदत करतो.
पालक वजन कमी करण्याबरोबरच लोह आणि कॅल्शियम देते. त्यामुळे हाडे मजबूत होण्याबरोबरच रक्त वाढीस मदत मिळते.
फ्लॉवरमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. त्यामुळे फ्लॉवर भूकेवर नियंत्रण ठेवते. तसेच यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी लाभदायक असतात.
90% पाणी असलेला दुधी भोपळा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते तर पचनक्रिया सुधारण्यासाठी दुधी भोपळा फायदेशीर ठरतो.
कोबीत कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. त्यामुळे कोबी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.