Mental Stress : मानसिक तणाव होईल दूर ; फॉलो करा 'या' सवयी

Mahesh Gaikwad

धकाधकीचे आयुष्य

आजकाल धकाधकीचे आयुष्य आणि बदलती जीवनशैली यामुळे बहुतांशी लोक मानसिक तणावाची समस्येने ग्रासलेले आहेत.

Mental Stress | Agrowon

मानसिक तणाव

मानसिक तणावाचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच, शिवाय यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवतात.

Mental Stress | Agrowon

दैनंदिन सवयी

दैनंदिन दिनचर्येत काही सवयींचा समावेश केल्यास आणि काही सवयी बदलल्याने मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Mental Stress | Agrowon

पुरेशी झोप घ्या

मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. दरोरज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे मन आणि आरोग्य निरोगी राहते.

Mental Stress | Agrowon

व्यायाम करा

दरोरज नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. परिणामी शारीरिक आरोग्य उत्तम राहिल्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.

Mental Stress | Agrowon

योग करा

नियमित योगाभ्यास केल्यामुळे शारीरिक आरोग्य तर सुधारतेच शिवाय तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासही फायदा होतो. दररोज योग केल्याने मन प्रसन्न राहते.

Mental Stress | Agrowon

संतुलित आहार

पोषक तत्त्वांनी भरपूर अशा अन्नाचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश केला, तर मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी फायदा होतो.

Mental Stress | Agrowon

निसर्गात वेळ घालवा

तुम्ही जर मानसिक तणावाच्या समस्येचा सामना करत असाल, तर दिवसातील काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल आणि फ्रेश राहाल.

Mental Stress | Agrowon

कुटुंबाला वेळ द्या

दरोजचे कार्यालयीन काम वेळेत पूर्ण करा. वर्कलाइफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करा. तसेच कुटुंबाला वेळ द्या. यामुळे मानसिक ताण कमी होईल.

Mental Stress | Agrowon

आवडीची गाणी ऐका

आवडीचे संगीत किंवा गाणी ऐकल्याने मन प्रसन्न राहते. जर आध्यात्मिक गोष्टींतून मन प्रसन्न होत असेल, तर त्यामुळेही मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

Mental Stress | Agrowon

सोशल मीडियाचा वापर

सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर करावा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणे टाळावे. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Mental Stress | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....