Aslam Abdul Shanedivan
सध्या अनेकांना पाठदुखी, सांधेदुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी अनेक जण डॉक्टरांच्या सल्लाबरोबरच घरगुती उपायांचा आधार घेतात. यामुळे पाठदुखी, सांधेदुखी सारख्या समस्या दूर होऊ शकतात
कोबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वं व फायटोन्यूट्रिएंट्स असतात जी दाहकविरोधी असतात. यामुळे कोबीची पानं सांधेदुखीवेळी गुंडाळल्यास सूज, वेदना कमी होते.
हळद दाहकविरोधी गुणधर्मांची असल्याने याचा नियमित आहारात समावेश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो
गरम पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून अंघोळ केल्याने वेदना व जळजळ कमी होण्यास मदत होते.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी निलगिरी तेलासह पेपरमिंट व लव्हेंडरसारख्या तेलांची मदत मिळते. या तेलांने वेदना होणाऱ्या त्वचेवर मालिश केल्यास आराम मिळतो
योगा, पोहण्याबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. (अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या)