Anuradha Vipat
दातांचा पिवळेपणा तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने काढायचा असेल तर तुम्ही याची सुरुवात तुमच्या स्वयंपाक घरातून करू शकता.
बेकिंग सोडा जो सौम्य अपघशक आहे जे दातांवर साचलेली घाण आणि पिवळसरपणा काढून टाकण्यास मदत करते.
अर्धा चमचा बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि हलक्या हाताने ब्रश करा.
बेकिंग सोड्यामध्ये खोबरेल तेल मिसळून ते दातांवर लावा दोन ते तीन मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने ब्रश करा.
बेकिंग सोडा वापरल्याने श्वासांची दुर्गंधी दूर होते आणि दात स्वच्छ होतात.
बेकिंग सोडा आठवड्यातून दोन ते तीन वेळापेक्षा जास्त वेळा वापरू नका. जास्त बेकिंग सोडा वापरल्यामुळे दातांच्या वरच्या थराला नुकसान होऊ शकते.