Mahesh Gaikwad
बऱ्याचदा घरामध्ये मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवली जाते. फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक न खाण्याचा सल्ला अनेकजण देतात.
पण आता तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणिकही वापरू शकता. फक्त कणिक मळताना काही गोष्टींची काळजी घेतली, तर फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडणार नाही.
कणिक मळताना नेहमी ताजे पाणी वापरावे. शिळ्या पाण्यामुळे कणिक लवकर आंबते. कणिक मळताना ताजे आणि कोमट पाणी वापरावे.
कणिक मळताना कणकेच्या वरच्या भागावर थोडेसे मोहरी किंवा रिफाइंड तेल लावावे. यामुळे कणकेत ओलावा बंद होतो आणि वर काळपटपणा येत नाही.
फ्रिजमध्ये कणिक ठेवताना कायम प्लास्टिक किंवा स्टीलचा हवाबंद भांड्याचा वापर करावा. जर डब्बा हवाबंद नसले, तर वरून प्लास्टिक पेपरने रॅप करावे.
जर तुमच्याकडे हवाबंद भांडे नसेल, तर एका प्लास्टिक पेपरमध्ये कणिक गुंडाळा आणि मग भांड्यात ठेवा. यामुळे ओलावा कणकेत जात नाही.
मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताना कायम फ्रिजच्या आतील मागच्या बाजूस ठेवावी. याठिकाणी तापमान कमी असते. दरवाजा समोर तापमान कमी-अधिक होत असल्यामुळे तेथे ठेवू नये.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मळलेली कणिक जास्त दिवस वापरू नये. एक ते दोन दिवसांत अशी कणिक वापरून टाकावी.