Mahesh Gaikwad
आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपली हाडे पेलतात. वाढत्या वयामुळे हाडे कमकुवत होतात. योग्य आहार आणि पोषणातून हाडांची मजबुती टिकवणे शक्य आहे.
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअमयुक्त असा आहार घेणे आवश्यक आहे. वाढच्या वयात पोषणाच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात.
काही फळे अशी आहेत, जी खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत करतात. जाणून घेवूयात कोणती आहेत ही फळे.
सफरचंदामध्ये व्हिटामिन-सी आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. ज्याच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात.
स्ट्रॉबेरीमध्ये हाडांसाठी उपयुक्त असणाऱ्या कॅल्शिअमसह पोटॅशिअम आणि व्हिटामिन-सी भरपूर प्रमाणात असते.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन-सी असते, जे हाडांमधील कोलेजन निर्मितीसाठी मदत करते. शिवाय संत्र्याच्या रसामध्ये थोड्या प्रमाणात कॅल्शिअमही असते.
कोरड्या किंवा ताज्या अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत ठेवायला मदत करते.
पेरूमध्ये व्हिटामिन-सी आणि के दोन्ही आढळतात. जे हाडांच्या मजबुती आणि झीज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.