Tilapiya Fish Farming : तिलापिया माशांचे संवर्धन फायद्याचे

Team Agrowon

तिलापिया मासे हे इजिप्शियन संस्कृतीमध्ये पुनर्जन्माचे प्रतीक मानले जातात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्याने नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

Tilapiya Fish Farming | Agrowon

तिलापीया मासे वनस्पती प्रथिने, एकपेशीय वनस्पती, परपोषित प्लवंग, जैवपूंज (बायोफ्लॉक), जिवाणू, प्लवंग आणि तलावाच्या तळातील कुजलेल्या घटकांचे रसाळ, चवदार आणि सौम्य मांसामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता असल्याने पाण्यातील कोंबडी अशीही ओळख मिळाली आहे.

Tilapiya Fish Farming | Agrowon

तिलापिया उत्पादनात चीन हा आघाडीचा देश असून, सुमारे १२० पेक्षा जास्त देशांमध्ये तिलापियाचे संवर्धन केले जाते.

Tilapiya Fish Farming | Agrowon

तिलापियाचे एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचे प्रमाण कमी व माशांची चव चांगली असते.

Tilapiya Fish Farming | Agrowon

मरतुकीचे प्रमाण खूप कमी. त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ व प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्याने दरही चांगला मिळतो.

Tilapiya Fish Farming | Agrowon

रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. बारमाही पाणी उपलब्ध असल्यास एका वर्षांमध्ये कमाल तीन उत्पादन घेता येऊ शकतात.

Tilapiya Fish Farming | Agrowon

Goat Farming : अशी घ्या व्यायलेल्या शेळीची काळजी