Goat Farming : अशी घ्या व्यायलेल्या शेळीची काळजी

Team Agrowon

शेळी व्यायल्यानंतर ३ ते ४ तासांनी वार म्हणजेच जार आपोआप पडते. पडलेल्या वारेची योग्यरीत्या विल्हेवाट लावली पाहिजे. जर वार २४ तासांत पडली नाही तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

Goat Farming | Agrowon

घरगुती उपाय वापरून वार ओढू नये किंवा कोणतेही उपचार करू नयेत कारण वार तुटल्यास ती गर्भाशयातच अडकून राहण्याची दाट शक्यता असते.

Goat Farming | Agrowon

शेळी व्यायल्यानंतर व्यायलेली जागा स्वच्छ करून जंतुनाशकाची फवारणी करून घ्यावी. शेळी विल्यानंतर मागचा भाग कोमट पाण्यात पोटॅशियम परमॅगनेट टाकून स्वच्छ धुवून घ्यावा.

Goat Farming | Agrowon

शेळी व्यायल्यानंतर पहिले तीन दिवस करडे शेळीसोबतच ठेवावेत. पण करडे जास्त प्रमणात दूध पिणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

Goat Farming | Agrowon

व्यायल्यानंतर पहिले तीन आठवडे शेळीला चरायला बाहेर सोडू नये. शेळी विताना अधिक उर्जा खर्ची पडलेली असते, त्यामुळे तिला उर्जायुक्त आहाराबरोबर पौष्टिक खाद्य, हिरवा चारा भरपूर प्रमाणात खाण्यास द्यावा.

Goat Farming | Agrowon

रोज कमीतकमी २०० ग्रॅम गोळी पेंड आणि २०० ग्रॅम मक्याचे दाणे द्यावेत. व्यायल्यानंतर शेळीला दररोज २० ते ३० ग्रॅम क्षारमिश्रण द्यावे.

Goat Farming | Agrowon

तिच्या शरीरातील क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी गोठ्यात चाटण वीट टांगून ठेवावी. पिण्यासाठी २४ तास स्वच्छ, निर्जंतुक पाणी द्यावे.

Goat Farming | Agrowon

Water Crisis : पाणीटंचाईची झळ ; महिलांचे हाल