Anuradha Vipat
थाॅयरॉईडच्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रुसिफेरस भाज्या खाताना विशेष खबरदारी घ्यावी लागते.
कोबीमध्ये गोइट्रोजेनिक घटक भरपूर प्रमाणात असतात. याचे कच्चे सेवन थायरॉईड ग्रंथीचे कार्य मंदावू शकते.
फ्लॉवर आरोग्यासाठी पोषक असला तरी थायरॉईड रुग्णांसाठी तो हानिकारक ठरू शकतो. हा थायरॉईड औषधांच्या परिणामात अडथळा आणू शकतो.
हायपोथायरॉईडच्या रुग्णांनी ब्रोकोलीचे अतिसेवन करणे टाळावे, कारण यामुळे थायरॉईड ग्रंथीला सूज येण्याचा धोका वाढतो.
पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्यातही गोइट्रोजेन्सचे प्रमाण आढळते.
मुळ्यामध्ये देखील थायरॉईड ग्रंथीचे कार्य मंदावणारे घटक असतात. कच्चा मुळा सॅलड म्हणून खाणे थायरॉईड रुग्णांनी टाळले पाहिजे.
मोहरीची पाने देखील थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये अडथळा आणू शकतात. त्यामुळे या पालेभाज्यांचे रोजच्या आहारात अतिसेवन करू नये.