Anuradha Vipat
मानवी स्वभाव हा अतिशय गुंतागुंतीचा आहे . प्रत्येकाचा स्वभाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.
हस्तरेखाशास्त्रामध्ये हाताच्या अंगठ्याच्या आकार, लांबी आणि लवचिकतेवरून व्यक्तीच्या स्वभावाचे अंदाज बांधले जातात.
जर तुमचा अंगठा तर्जनीच्या खालच्या रेषेपर्यंत लांब असेल, तर तुम्ही महत्त्वाकांक्षी, दृढनिश्चयी आणि आत्मविश्वासू आहात
ज्या लोकांचा अंगठा मध्यम लांबीचा असतो. ते लोक संतुलित, व्यावहारिक आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणारे असतात.
ज्यांचा अंगठा तळव्याच्या रेषेच्या खूप खाली असतो, असे लोक कधीकधी आत्मविश्वास कमी असलेले, भावनाप्रधान आणि इतरांवर अवलंबून राहणारे असतात.
जर तुमचा अंगठा सहजपणे मागे वळत असेल, तर तुम्ही खूप मनमिळाऊ, उदार, लवचिक स्वभावाचे आहात.
जर अंगठा ताठ असेल आणि सहज मागे वळत नसेल, तर तुम्ही शिस्तबद्ध, हट्टी, कठोर स्वभावाचे असता.