Anuradha Vipat
शरीरात पाणी कमी होणे म्हणजे 'डिहायड्रेशन' होणं. आज आपण पाहूयात शरीरात पाणी कमी झाल्यावर कोणते गंभीर परिणाम दिसू शकतात.
शरीरात पाणी कमी झाल्यावर तहान लागते. हे पाणी कमी झाल्याचे सर्वात पहिले आणि मुख्य लक्षण आहे.
शरीरात पाणी कमी झाल्यावर तोंड आणि त्वचा कोरडी पडते.
शरीरात पाणी कमी झाल्यावर मूत्राचे प्रमाण कमी होते
शरीरात पाणी कमी झाल्यावर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते आणि खूप थकवा जाणवतो.
शरीरात पाणी कमी झाल्यावर मेंदूपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह न झाल्यामुळे चक्कर येते, डोके दुखते.
शरीरात पुरेसे पाणी नसल्यास अन्न पचण्यास अडचण येते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी होऊ शकते.