Mahesh Gaikwad
अमेरिकेच्या लॉस एंजलिस, कॅलिफोर्नियामध्ये विविध प्रजातींच्या वनस्पतींचा समावेश असलेले बोटॅनिकल गार्डन साकारण्यात आले आहे.
या गार्डनमध्ये झाडांच्या विविध प्रकारच्या प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे.
हे गार्डन ८७ एकर क्षेत्रात पसरलेले असून यामध्ये विविध प्रजातींच्या दिड लाख वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे.
साठ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या गार्डनमध्ये निवडुंगाच्या विविध प्रजाती वाढविण्यात येत आहेत.
निवडुंग हे अमेरिका खंडातले खंडातले झाड असून वाळवंटी प्रदेशात सापडणारा वनस्पतींचा प्रकार आहे.
वनस्पतीच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते.
या गार्डनमध्ये निवडुंगाच्या अशाच लुप्त होत जाणाऱ्या प्रजाती संवर्धित करण्यात आल्या आहेत.