Aslam Abdul Shanedivan
यंदा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा जिंकता आल्या आहेत
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ३९ हजार ३५५ मतांनी पराभव झाला आहे.
संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा १० हजार ५६० मतांनी पराभव करत काँग्रेसला झटका दिला
ठाकरे घराण्यातील यंदा दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यात एकीकडे आदित्य ठाकरे यांचा विजय झाला. पण दुसरीकडे अमित ठाकरे यांचा पराभव झाला.
बाबा सिद्दिकी यांची मृत्यूमुळे वांद्रे-पूर्वमधून झिशान सिद्दिकी यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा होती. मात्र झिशान सिद्दीकी यांचा धक्कादायक पराभव झाला.
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला.
वसई मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा भाजपच्या स्नेहा पंडित यांनी ३१५३ मतांनी पराभव केला.
माझ्या शिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही म्हणणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचा प्रवीण तायडे यांनी अचलपूर मतदारसंघातून पराभव केला. ते चार वेळी आमदार राहिले होते.