Team Agrowon
हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची गरज असते, पीकवाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी द्यावे.
हळद लागवड गादी वाफ्यावर करावी. बेणे प्रक्रिया करावी. जोड ओळीतील अंतर १ फूट आणि दोन बेण्यातील अंतर १५ सेंमी ठेवावे. लागवड खोलवर करावी.
हळदीसाठी इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर करावा. ठिबक नळीपेक्षा ड्रीपरची निवड महत्त्वाची असते. सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा.
खत व्यवस्थापन करण्यापूर्वी माती परीक्षण करावे. यामुळे कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जमिनीचा सामू, खताची विद्राव्यता याच्या अहवालानुसार खताचे नियोजन करावे.
ठिबक सिंचनाद्वारे मुळाच्या कक्षेत खते दिली जातात. निचरा होत नाही. एकसमान वितरण होण्यासाठी व्हेंचुरीचा वापर करावा.
जमिनीमध्ये हवा, अन्नद्रव्ये आणि पाणी याचा योग्य समतोल राखला जातो. जमीन कायमस्वरूपी वाफसा अवस्थेत राहते. खते ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ होते. योग्य खते योग्य वेळी दिली जातात.
कमी पीपीएम पातळीची खते जास्त परिणामकारक असतात. ही खते जास्त प्रमाणात घेतली जातात.