Ragi Cultivation : हे आहे नाचणी लागवडीचे सुधारित तंत्र

Team Agrowon

जमीन

नाचणी लागवडीसाठी हलक्‍या ते मध्यम प्रतीची, चांगले सेंद्रिय पदार्थ असणारी, ५.५ ते ८.५ सामू असणारी जमीन योग्य असते. 

Ragi Cultivation | Agrowon

नांगरट

जमिनीची नांगरट करून पुरेसे शेणखत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्याची गरज नाही. 

Ragi Cultivation | Agrowon

लागवड तंत्र

३० x १० सें.मी. अंतरावर पाभरीने पेरणी केल्यास हेक्‍टरी दहा किलो बियाणे लागते. पुनर्लागवड पद्धतीने बियाणे पेरणी केल्यास पाच किलो प्रतिहेक्‍टरी बियाणे लागते. 

Ragi Cultivation | Agrowon

रोपवाटिका

एक हेक्‍टर क्षेत्र लागवडीसाठी पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. पाच गुंठे क्षेत्र रोपवाटिकेसाठी पाच क्विंटल शेणखत गादी वाफ्यावर मिसळावे.

Ragi Cultivation | Agrowon

शेणखत

पुनर्लागवडीपूर्वी प्रतिहेक्‍टरी पाच टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्‍टरी २५ किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २५ किलो पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे.

Ragi Cultivation | Agrowon

रोपांची पुनर्लागवड

गादी वाफ्यावर रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागवड २० x ४० सें.मी. जोडओळ पद्धतीने करावी.

Ragi Cultivation | Agrowon

पुनर्लागवडीपूर्वी प्रतिहेक्‍टरी पाच टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्‍टरी २५ किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २५ किलो पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे.

Ragi Cultivation | Agrowon

आंतरमशागत

लागवडीनंतर साधारणपणे दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी दाट झाली असल्यास पहिल्या २० ते २५ दिवसांपर्यंत विरळणी करून एका जागी एकच जोमदार रोप ठेवावे.

Ragi Cultivation | Agrowon