Team Agrowon
इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय उत्तम रीतीने करता येतो.
सध्या बेकरीतील विविध उत्पादने मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यामुळे या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
पूर्वी ठरावीक प्रसंगी म्हणजेच फक्त वाढदिवसालाच बेकरीतील केक खाल्ला जायचा. आता मात्र कोणत्याही प्रसंगी केक अथवा इतर बेकरी उत्पादने सर्रास खाल्ली जातात.
बेकरी उद्योग उभारताना बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता असलेले ठिकाण निवडावे.
बेकरी पदार्थाची विक्री कोणत्या भागामध्ये चांगली होऊ शकते, याचे सर्वेक्षण करावे. आजूबाजूच्या बेकरीमधील विक्रीचा अंदाज घ्यावा.
स्थानिक पातळीवर उद्योजकता विकासासाठी बेकरी उद्योग महत्त्वाचा आहे. या उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक यंत्रे, उपकरणांची माहिती घेऊन उद्योगाला सुरुवात करावी.
बेकरी व्यावसायात एकदा जम बसल्यानंतर मजुरांची उपलब्धता पाहुन व्यवसाय वाढवावा.