Anuradha Vipat
एका वेळी एका पेक्षा जास्त फळे खाणे टाळा. फळांचे प्रमाण कमी ठेवल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते.
फळांचा रस पिण्याऐवजी पूर्ण फळे खाणे चांगले. कारण पूर्ण फळांमध्ये फायबर जास्त असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
शक्यतो हंगामी फळे खाण्याचा प्रयत्न करा. कारण ती ताजीतवानी आणि पौष्टिक असतात.
फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचे सेवन मधुमेही व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते.
पॅकबंद किंवा कॅन केलेला फळांवर साखर किंवा इतर घटकांचे प्रमाण तपासा.
सफरचंद, नाशपाती, बेरी , संत्री, आणि पेरू यांसारखी फळे कमी GI असलेली मानली जातात.
पिकलेले केळी, आंबा, आणि अननस यांसारखी फळे जास्त GI असलेली मानली जातात.