Anuradha Vipat
आपल्या आयुष्यातील काही गोष्टी जितक्या गुप्त किंवा प्रायव्हेट राहतील, तितके आपण सुखी आणि सुरक्षित राहतो.
चाणक्य नीती आणि सामाजिक शास्त्रानुसार, खालील गोष्टी कधीही इतर कोणासमोरही उघड्या करू नयेत.
तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे किंवा तुमचे उत्पन्न किती आहे, हे कधीही सांगू नका.
घरातील भांडणे, पती-पत्नीमधील वाद किंवा कौटुंबिक समस्या चार भिंतींच्या आतच राहू द्या.
तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कोणता नवीन व्यवसाय सुरू करणार आहात, हे काम पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही सांगू नका.
तुमच्या पार्टनरसोबतचे नाते किती घट्ट आहे किंवा तुमच्यात काय मतभेद आहेत, ही पूर्णपणे तुमची प्रायव्हेट गोष्ट आहे.
केलेल्या मदतीची किंवा दानाची वाच्यता केल्याने पुण्याचे फळ नष्ट होते आणि त्याला मदत नव्हे तर 'अहंकार' मानले जाते.