Anuradha Vipat
मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते.
धार्मिक महत्त्व असल्यामुळे या महिन्यात काही गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मांसाहार, मद्यपान आणि इतर तामसिक पदार्थ खाणे किंवा सेवन करणे पूर्णपणे टाळावे.
मार्गशीर्ष महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे.
या पवित्र महिन्यात घरात भांडणे, वादविवाद किंवा कलह करणे टाळावे.
कांदा आणि लसूण हे पदार्थ तामसिक मानले जातात. त्यामुळे या महिन्यात पदार्थ आहारात वापरणे टाळावे.
या महिन्यात कोणाशीही अपशब्द बोलू नये, कोणाचा अपमान करू नये.