Anuradha Vipat
प्रेग्नन्सीमध्ये आई आणि बाळ दोघांचे आरोग्य जपण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे असते.
कच्ची किंवा अधवट पिकलेली पपई आणि अननस खाणे टाळावे. यामध्ये अशी काही एन्झाइम्स असतात ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
चहा, कॉफी किंवा कोला पेयांचे अतिसेवन टाळा. दिवसातून दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिणे बाळाच्या वजनावर परिणाम करू शकते.
अर्धवट शिजवलेले मांस, मासे किंवा कच्ची अंडी खाऊ नका. यातून 'लिस्टेरिया' किंवा 'साल्मोनेला' सारख्या जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो.
जड बादल्या, फर्निचर किंवा मोठी वजने उचलणे टाळा. यामुळे पोटावर आणि पाठीवर ताण येऊन गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय साध्या डोकेदुखीची किंवा तापाची गोळीही घेऊ नका.
अल्कोहोल आणि सिगारेटचा धूर बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि अवयवांसाठी अत्यंत धोकादायक असतो.