Anuradha Vipat
बाथरूममध्ये काही गोष्टी ठेवल्यास त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
बाथरूममध्ये ओला टॉवेल लटकवल्यास तो बॅक्टेरिया आणि जिवाणू वाढवतो.
रेझरवर ओलावा जास्त काळ राहिल्यास, ते गंजतो आणि त्यावर बॅक्टेरिया वाढतात.
बाथरूममध्ये ठेवलेले ब्रश बॅक्टेरिया आणि जिवाणूंनी भरलेले असू शकते. आपण ब्रशने दात घासतो तेव्हा ते बॅक्टेरिया आपल्या तोंडात जातात आणि तोंडाचे आजार होऊ शकतात.
बाथरूममध्ये मोबाईल फोन घेऊन जाणे देखील धोकादायक असू शकते. कारण मोबाईल फोनवर बॅक्टेरिया असतात
टॉयलेट क्लीनरमध्ये असलेले रासायनिक घटक डोळ्यांना आणि श्वासाला त्रास देऊ शकतात.
बाथरूममध्ये ओल्या वस्तूंमुळे बॅक्टेरिया वाढू शकतात.