Tamrind Cultivation : चिंच लागवडीसाठी या गोष्टी आवश्यक

Team Agrowon

कोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड, लागवडीसाठी प्रमुख जातींची निवड आणि अभिवृद्धी याविषयी माहिती असणे आवश्‍यक आहे.

Tamrind Cultivation | Agrowon

रोप किंवा कलमांची लागवड करण्यासाठी १ × १ × १ मी. आकाराचे खड्डे करावेत.

Tamrind Cultivation | Agrowon

कलमी आणि कमी घेर असणाऱ्या झाडांची लागवड ६ × ६ मी, किंवा ८ × ६ मी, ८ × ८ मी या अंतरावर जून ते ऑगस्ट या महिन्यात करावी. बांधावरती लागवड ही ३० फुटांपेक्षा जास्त अंतरावर करावी.

Tamrind Cultivation | Agrowon

एक-दोन चांगले पाऊस पडल्यानंतर रोप किंवा कलमांची मुख्य शेतात लागवड करावी. त्यामुळे पावसाळी दमट हवामानाचा झाडांच्या वाढीसाठी भरपूर फायदा होतो. झाडांची मर कमी होते आणि वाढ जोमाने होते.

Tamrind Cultivation | Agrowon

उन्हाळ्यामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आळ्यामध्ये वाळलेले गवत, लाकडाचा भुसा व पाचट आच्छादन फायदेशीर ठरते.

Tamrind Cultivation | Agrowon

मूळकूज किंवा वाळवी पासून संरक्षण होण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशक व कीटकनाशकांची आळवणी प्रत्येक रोपाच्या आळ्यात करावी.

Tamrind Cultivation | Agrowon

झाडाला सुरुवातीला वळण देण्यासाठी रोप एक मीटर उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा, जेणेकरून चारी दिशांना फांद्यांची वाढ होऊन आकार डेरेदार होईल.

Tamrind Cultivation | Agrowon