Gir Cow Clone Technology : देशातील पहिला गीर गाईचा क्लोन विकसीत

Team Agrowon

राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी देशात पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीने गीर गायीचा क्लोन तयार करण्यात यश मिळवले आहे.   

Gir Cow Clone Technology | Agrowon

राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेने उत्तराखंड पशुधन विकास मंडळ, डेहराडूनच्या सहकार्याने २०२१ मध्ये गीर, साहिवाल आणि रेड-सिंधी सारख्या देशी गायींचे क्लोनिंग करण्याचे काम सुरू केले. 

Gir Cow Clone Technology | Agrowon

१६ मार्च २०२३ रोजी गीर जातीच्या क्लोन मादी वासराचा म्हणजेच कालवडीचा जन्म झाला. या कालवडीला गंगा नाव देण्यात आले.

Gir Cow Clone Technology | Agrowon

हा देशातूल पहिलाच प्रयोग असून क्लोनिंग तंत्राने १०० टक्के जातिवंत जनावराची निर्मिती शक्य होते. 

Gir Cow Clone Technology | Agrowon

हे वासरु निरोगी असून जन्माच्या वेळी त्याचे वजन ३२ किलो भरले. यानंतर क्लोनिंग तंत्राने जातिवंत वळूचीही निर्मित केली जाणार आहे. 

Gir Cow Clone Technology | Agrowon

क्लोनिंग तंत्रामुळे दुधाळ जनावरांची संख्या नैसर्गीक पद्धतीच्या तुलनेत वाढवता येते. याशिवाय नामशेष होत चाललेल्या जातिवंत जनावरांचे संवर्धन करण्यास क्लोनिंग तंत्रामुळे मदत होणार आहे. 

Gir Cow Clone Technology | Agrowon
Banana processing | Agrowon
वआणखी पाहा...