Swarali Pawar
याला कम्बाइन हार्वेस्टर म्हणतात. एका दिवसात १.५ ते २ हेक्टर भात व गहू कापणी करता येते. वेळ व खर्च दोन्हीमध्ये मोठी बचत होते.
बटाटा, हळद, आले या पिकांची काढणी सोपी करते. मजुरीपेक्षा ३५-४०% खर्च कमी व ६०% वेळ वाचतो.
कॉर्न हार्वेस्टर मक्याचे देठ कापून कणीस वेगळे करतो. दाणे स्वच्छ करून विक्रीसाठी तयार होतात. किंमत सुमारे ९५ हजार ते ३ लाख.
लहान व हलके यंत्र, एका दिवसात २०० किलो मका दाणे वेगळे करू शकते. लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व परवडणारे.
भुईमूग शेंगा फोडून शेंगदाणे वेगळे करते. तासाला ६४ किलो शेंगदाणे स्वच्छ होतात. लहान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर.
होलकेन हार्वेस्टर एका तासात एक एकर ऊस कापतो. मजुरांपेक्षा जलद व कमी खर्चिक. किंमत १० ते ९४ लाख.
सोयाबीन, मका, हरभरा, गहू, ज्वारी, भात या पिकांची मळणी करता येते. किंमत १.५ ते २.५ लाखांदरम्यान.
१५०-२०० एचपी इंजिनवर चालते. ऊस कापणी व ट्रॉलीत भरण्याचे काम एकत्र करते. वेळेत ६०-७०% बचत.