Swarali Pawar
शेड पूर्व-पश्चिम दिशेत असावा आणि थोडा उंच व कठीण जमिनीवर बांधावा. त्यामुळे ओलावा टाळला जातो आणि हवामानानुसार वातावरण खेळते राहते.
कोंबड्यांसाठी १८ ते २५ अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानले जाते. खेळती हवा असणे हे रोग टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. शेडच्या आसपास मोठी झाडे असल्यास उष्ण वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो आणि शेडमधील वातावरण गार राहते.
शेड साधारण २०-३० फूट रुंद आणि ७-१० फूट उंच असावा. लांबी कोंबड्यांच्या संख्येनुसार ठरवावी.
शेड नेहमी उंच व कठीण जमिनीवर बांधावा. ओलसर जागेत बांधल्यास रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.
शेडचा पाया आणि जमिनीचा भाग सिमेंट काँक्रीटचा असावा. दरवाजे २.५ फूट रुंद आणि ६ फूट उंच ठेवावेत. बाजूला उघडी जागा जाळीने झाकावी.
कोंबड्यांना अनेक विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोग होतात. त्यामुळे शेडची नियमित स्वच्छता व वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.
शेड रिकामे झाल्यावर कचरा काढून चुना-पाण्याने धुणे, भिंतींवर चुना लावणे व लिटर कोरडे ठेवणे फार महत्त्वाचे आहे.
ग्लुट्रॉअल्डीहाइड, डायहायड्रोक्सिन किंवा फॉर्मल्डीहाइडचे द्रावण वापरून शेड निर्जंतुकीकरण करावे. फवारणी करताना नाक, तोंड आणि डोळ्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.