Mahesh Gaikwad
गेले काही दिवस भारत आणि मालदीवमध्ये समुद्री पर्यटनावरून वाद सुरू आहे. भारताचे पंतप्रधान यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवने भारतविरोधी वक्तव्य करत टीका केली होती.
भारताविरोधात टीका करणे मालदीवला चांगलेच महागात पडले आहे. अनेक भारतीयांसह टूरीझम कंपन्यांनी मालदीवमधील बुकिंग रद्द केले आहे.
पण भारतात मालदीवपेक्षाही सुंदर अशी पाच बेटे आहेत जी मालदीवपेक्षा अधिक पटीने सुंदर आहेत.
भारत-मालदीव वादानंतर आता समुद्री पर्यटनासाठी लक्षद्वीप हा मालदीवचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून समोर आला आहे.
आसाममधील ब्रह्मपुत्र नदीमधील माजुली द्वीप आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिध्द आहे.
यासोबतच गुजरातच्या दक्षिण भागात दूरव पसरलेले द्वीप आयलंडचीही पर्यटकांना भूरळ पडते.
तुम्ही जर भारतातच सुंदर समुद्र किनाऱ्याच्या शोधात असाल तर केरळच्या मुनरो बेटाची एकदा सफर कराच.
अंदमान-निकोबार बेट समुहातील हैसलॉक आयलंड जगभरात आपल्या समुद्री सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे.