Roshan Talape
पावसात पेरूवर धूळ आणि बुरशी साचू शकते, त्यामुळे त्वचा आणि पोटाचे त्रास होऊ शकतात.
चिकू पावसात लवकर सडतो आणि बुरशी लागल्यास सर्दी व घशाचे त्रास होऊ शकतात.
पावसात फणस लवकर सडते, त्यामुळे अपचन आणि अॅलर्जीचा धोका वाढतो.
पावसाळी हवामानात साठवलेले आंबे लवकर खराब होतात. त्यामुळे त्यातून बुरशीचा संसर्ग होऊ शकतो.
पावसात ही फळे कापल्यानंतर लवकर खराब होतात, कारण बॅक्टेरिया लवकर वाढतात.
कापलेली पपई जास्त वेळ ठेवल्यास जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्यामुळे ताजी नसेल तर ती खाणं टाळावं.
पावसात उघड्यावर ठेवलेली फळे लवकर दूषित होतात, त्यामुळे अशी फळे खरेदी करणे टाळावीत.
पावसाळ्यात फळे नेहमी स्वच्छ धुऊन, ताजी आणि घरात साठवलेलीच खावी. कटलेली किंवा सडलेली फळे खाणे टाळावे.