Anuradha Vipat
तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उत्तम पदार्थ आहेत. आज आपण ते काणते पदार्थ आहेत याबद्दल जाणून घेऊयात
एवोकॅडोमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
बाजरी, ओट्स, आणि क्विनोआ यांसारख्या संपूर्ण धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
पालक, मेथी, आणि इतर पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
केळी, बेरी आणि लिंबूवर्गीय फळे पोटॅशियम आणि फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहेत, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
दही, दूध आणि इतर कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.