Honey Bee Keeping : मधमाशीपालनातून मिळतात हे महागडे मौल्यवाण पदार्थ

Team Agrowon

मधाबरोबर इतर ही पदार्थांची निर्मिती

मधमाशीपालनातून मधाबरोबर पोलन, मेण, प्रॉपोलिस, रॉयल जेली आणि बी व्हेनम यांसारख्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते.

Honey Bee Keeping | Agrowon

इतर पदार्थांची निर्मिती फारच कमी

भारतामध्ये मात्र मधापासून मिळणाऱ्या पदार्थांचा विचार केला तर मधाव्यतिरिक्त इतर पदार्थांची निर्मिती फारच कमी प्रमाणात केली जाते. 

Honey Bee Keeping | Agrowon

मेण

मधमाशीपालनातून मेणाचे उत्पादन मिळते. या मेणाचा वापर चर्म उद्योग तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. मेणबत्ती बनविण्यासाठी मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो.

Honey Bee Keeping | Agrowon

रॉयल जेली

रॉयल जेली हा राणीमाशीला दिले जाणारा मुख्य अन्नस्रोत असतो. राणीमाशीला व तरुण अळी अवस्थेतील पिलावळीस हे भरवले जाते. मानवी आरोग्याच्या दृष्टीने रॉयल जेली उपयुक्त आहे.

Honey Bee Keeping | Agrowon

बी व्हेनम

याचा उपयोग संधिवाताच्या उपचारासाठी केला जातो.

Honey Bee Keeping | Agrowon

पराग

मधमाश्‍या फुलांवरून पराग गोळा करतात. त्याचा उपयोग त्यांच्या अन्नामध्ये होतो. परागामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. परागाचा उपयोग औषध निर्मिती तसेच प्रथिनांच्या पावडरमध्ये केला जातो.

Honey Bee Keeping | Agrowon

प्रोपोलिस

हा पदार्थ कामकरी माश्‍या झाडांमधून स्रवणाऱ्या डिंकापासून मिळवतात. याचा उपयोग वसाहतीतील डागडुजीच्या कामांमध्ये केला जातो. प्रोपोलिस हा पदार्थ औषधी गुणधर्मयुक्त असतो. त्याचा वापर जखमा भरून येण्यासाठी केला जातो.

Honey Bee Keeping | Agrowon
आणखी पाहा...