Roshan Talape
सध्याच्या धावपळीमुळे अनेकदा आता 'बस्स्' असे म्हणण्याची वेळ येते. अशावेळी आपल्या मेंदूला विश्रांतीची आवश्यकता असते. याचे काही संकेत आहेत. ते पुढीलप्रमाणे...
अंगदुखी, सतत थकवा किंवा शरीरात उर्जा कमी वाटणे, हे शरीर व मेंदूसाठी विश्रांतीचे संकेत आहे.
झोप न लागणे, झोपेत सतत व्यत्यय येणे किंवा खूपच झोप लागत असेल तर ह्या गोष्टी शरीराला विश्रांतीची गरज असल्याचे दर्शवतात.
नेहमी राग येणे त्यातून चिडचिड निर्माण होणे हे सुद्धा मानसिक थकव्याचे एक लक्षण आहे.
ताण, तणाव किंवा नैराश्यामुळे व्यक्ती सामाजिक संपर्कांपासून दूर राहणे पसंद करतो, हे कारण मेंदू थकल्याचे ठरु शकते.
कामाच्या ठिकाणी उत्साह जाणवत नसेल किंवा कामात मन लागत नाही. ही गोष्ट मानसिकदृष्ट्या थकव्याची असते.
पचनाच्या समस्या, सतत डोकेदुखी किंवा इतर शारीरिक समस्या उद्भवतात. या समस्यांमध्ये आपला मेंदूला विश्रांतीची आवश्यकता असते.
कामावर लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येणे किंवा निर्णय घेण्यात वेळ लागणे. काम करताना वारंवार चुकणे किंवा चुका सुधारण्यात खूप वेळ लागणे हा सुद्धा एक संकेत आहेत.
कामाच्या तणावामुळे तुमचे मन शांत नसेल किंवा सतत चिंतेत, नैराश्यपणा जाणवत असेल, तर मानसिक विश्रांतीची गरज आहे.