Ganeshotsav 2024 : मुंबईतील गणपती तुम्ही पाहिलेत का ? चला तर पाहूयात प्रसिद्ध असणारे मुंबईतील 'हे' १० बाप्पा...

Roshan Talape

मुंबईतील प्रसिद्ध गणपती

मुंबईतील गणपती त्यांची भव्यता, सजावटी आणि भक्तिपूर्वक वातावरणासाठी ओळखले जातात. चला तर पाहूयात मुंबईतील 10 प्रसिद्ध गणपती...

Ganesh Chaturthi 2024 | Agrowon

लालबागचा राजा

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1934 साली झाली. हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध तसेच भक्तांचे श्रद्धास्थान असलेला गणपती आहे. मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणेश मूर्तीच्या भव्यतेसाठी हा लालबागचा राजा ओळखला जातो.

Lalbaugcha Raja | Agrowon

सिद्धिविनायक मंदिर गणपती

श्री सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती प्रभादेवी परिसरात १८०१ पासून स्थित आहे. ही मुर्ती अत्यंत सुंदर आणि शक्तिशाली मानली जाते. गणपतीचे अनेक भक्त इथे नवस मागण्यासाठी येतात त्यामुळे सिद्धिविनायकाला "नवसाचा गणपती" म्हणून ओळखले जाते.

Siddhivinayak Ganpati | Agrowon

गणेश गल्ली (मुंबईचा राजा)

मुंबईचा राजा" म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. भक्ती, सेवा, आणि समाजसेवा या तिन्ही अंगांनी हे मंडळ १९२८ पासून आपले स्थान जपून आहे. ही मूर्ती लालबागजवळ असल्यामुळे प्रसिद्ध आहे.

Ganesh Galli Mumbaicha Raja | Agrowon

जी एस बी सेवा मंडळ गणपती (किंग्ज सर्कल)

10 ते 12 फूट गणपती मुर्तीची उंची असणारे सेवा मंडळ हे १९६५ पासून सामाजिक कार्यांसाठी आणि भक्तांच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंडळ मुंबईतील किंग्ज सर्कल भागात स्थित असून, सोने आणि मौल्यवान दागिन्यांनी सजवलेली श्रीमंत गणेशमूर्ती म्हणून ओळखली जाते.

GSB Seva Mandal Ganpati | Agrowon

अंधेरीचा राजा

उत्साही मिरवणुकांसाठी आणि दीर्घ विसर्जन कालावधीसाठी ही मूर्ती अंधेरीत लोकप्रिय आहे. अंधेरीच्या या राजाची स्थापना १९६६ मध्ये झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श ठरलेलं हे गणपती मंडळ आहे.

Andhericha Raja | Agrowon

खेतवाडीचा राजा

खेतवाडीचा राजा हा 'नवसाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे. या गणपतीची स्थापना १९५९ साली झाली. येथील गणेशमूर्ती साधारणतः ३० ते ४० फूट उंच असते आणि दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारित सजावट केली जाते. यासाठी हा खेतवाडीचा राजा प्रसिद्ध आहे.

Khetwadicha Raja | Agrowon

गिरगावचा राजा

गिरगावच्या राजाची स्थापना १९५० मध्ये झाली. भक्तांना एकत्र आणणे तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे हे या मंडळाच्या स्थापनेमागील उद्दिष्ट यामुळे गिरगावातील हा गणपती लोकप्रिय आहे.

Girgaon Ganpati | Agrowon

चिंचपोकळीचा चिंतामणी

मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मूर्तींपैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी हा प्रसिद्ध आहे. हे गणपती मंडळ १९१९ साली स्थापन झालं असून परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित, धार्मिक महत्त्वासाठी आणि प्राचीन गणपती मुर्तींसाठी भक्तांना प्रिय आहे.

Chinchpokli Chintamani | Agrowon

डोंगरीचा राजा

१९३९ पासून मुंबईतील डोंगरी परिसरातील एक प्रसिद्ध आणि मान्यता असलेला गणपती मंडळ आहे. गणेशमूर्तीचं पारंपरिक आणि तेजस्वी रूप भक्तांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करते त्यामुळे या गणेशभक्तांमध्ये डोंगरीचा राजा विशेष लोकप्रिय आहे.

Dongricha Raja | Agrowon

किल्ला इच्छापूर्ती गणेश

मुंबईच्या फोर्टमध्ये असलेली ही गणेश मूर्ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखली जाते. 1982 साली प्रथम या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. इच्छापूर्ती गणेश मूर्तीच्या भव्यतेमुळे भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण झाले आहे.

Fort Icchapurti Ganpati | Agrowon

NIRF Ranking Agriculture Institutes 2024 : शेतीमधील करिअरसाठी 'ही' आहेत 'NRIF' मानांकनातील सर्वोत्कृष्ठ ७ महाविद्यालये

आणखी पाहा