sandeep Shirguppe
निरोगी राहण्यासाठी स्वयंपाकघरात आयुर्वेदीक ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो.
ऑलिव्ह ऑईलचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. याचे अनेक फायदे आहेत.
शरिराला तणाव आला तर आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या परिस्थितीमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्त ठरते.
आपल्या शरीरातील सेरोटोनिन या हार्मोनची पातळी वाढवण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते.
ऑलिव्ह तेलामुळे शरीरातील वात देखील कमी होतो, ज्यामुळे, मानसिक आरोग्य चांगले राहते.
पोट जड होणे, पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे.
ज्याना मधुमेह आहे आणि हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल हे अतिशय रामबाण आहे.