Soybean Seed : हे आहेत घरचं सोयाबीन बियाण वापरण्याचे फायदे

Team Agrowon

सोयाबीन हे स्वपरागीभवन प्रकारातील पीक असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे स्वतः तयार करून त्याचा वापर करणे फायदेशीर आहे.

Soybean Seed

स्वतःचे बियाणे तयार करताना विषाणूजन्य रोगापासून मुक्त असावे, मळणी यंत्रातील शिल्लक धान्याची बियाण्यामध्ये भेसळ नसावी. फुटके बियाणे नसावे

Soybean Seed

बियाणे साठवण करताना गोणीची आदळआपट करू नये. गोणीची एकावर एक थप्पी लावू नये. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी.

Soybean Seed

उगवण क्षमता तपासणीसाठी सोयाबीनच्या १०० बिया मोजून गोणपाटावर रांगेत मांडाव्यात. त्यानंतर गोणपाटाची हळुवार गुंडाळी करून त्यास पाण्यामध्ये ओले करून अंधाऱ्या खोलीत ठेवावे. ८ ते १० दिवसांनी मोड आलेल्या बिया मोजाव्यात.

Soybean Seed

७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असणारे बियाणे पेरणीसाठी वापरावे.

Soybean Seed

पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करावा. यामुळे बियाणे योग्य खोलीवर पेरले जाईल, पेरणीसाठी बियाणे कमी प्रमाणात लागेल.

Soybean Seed

पुरेसा पाऊस झाल्यानंतरच (७५ मिमी) पेरणी करावी, जेणेकरून बियाणे पूर्ण क्षमतेने उगवेल.

Soybean Seed