sandeep Shirguppe
लिंबाचा रसाबरोबर त्याची साल देखील फायदेशीर आहे, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करण्यासाठी हे गुणकारी आहे.
लिंबाप्रमाणेच त्याच्या सालीमध्येही अँटिऑक्सिडेंट असतात. चेहर्यावर नियमितपणे लावल्याने सुरकुत्या आणि रेंगाळे दूर राहतात.
अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी एजिंग साइनस कमी करण्यासाठी देखील कार्य करते.
लिंबाची साले बारीक करून त्यात दही घालून क्लींजर तयार होईल आणि याच्या मदतीने त्वचा आतून स्वच्छ करता येईल.
जर तुम्हाला महागड्या उत्पादनांऐवजी नॅच्युरल एक्सफोलिएंट घटक वापरायचे असतील तर लिंबाच्या साली वापरा.
लिंबाच्या सालीमध्ये साखर मिसळा आणि त्वचेवर स्क्रब करा. याने डेड स्किन निघून जाईल.
लिंबाच्या सालीच्या माध्यमातून तुम्ही काळे डाग दूर करून त्वचा गोरे करण्याचे फायदे मिळवू शकता.
ग्लोसाठी लिंबाच्या सालींची पेस्ट बनवा आणि त्यात नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि त्वचेला लावा.
तेलकट त्वचा असलेले लोक उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लिंबाची साल आणि बेसन हे घरगुती उपाय करून पाहू शकतात.