sandeep Shirguppe
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याची चव कडू असली तरी, कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात.
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कडूलिंबाने रक्तातील टॉक्सिन बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते.
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने ऍसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
खनिजे आणि अँटीऑक्सिडंट कडुनिंबाच्या पानांमध्ये असतात, याने सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठी उपयोग होतो.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस साधारणपणे सेवन केल्यास हृदविकाराचा धोका कमी होतो.
आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील अर्धे आजार बरे होतात.