Rice Water : तांदूळ धुतलेलं पाणी फेकून देताय थांबा हे आहेत फायदे

sandeep Shirguppe

भात शरिराला ऊर्जा

लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना भात खायला आवडतो. भात शरीराला ऊर्जा प्रदान करतो.

Rice Water | agrowon

तांदूळ पाण्याचे फायदे

आपण तांदूळ शिजवताना त्यांचे पाणी फेकून देतो. पण या तांदळाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Rice Water | agrowon

तांदळाचा स्टार्च

कच्चा तांदूळ ३० मिनिटे पाण्यात उकळवल्याने त्यातील जास्त स्टार्च पाण्यात सोडतो. ज्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो.

Rice Water | agrowon

त्वचेसाठी टोनर

तांदळाचे पाणी त्वचेसाठी टोनर, क्लिन्झर, त्वचा उजळवण्यासाठी, हायपरपिग्मेंटेशन, सन टॅन म्हणून काम करेल.

Rice Water | agrowon

अँटी-ऑक्सिडंट्स

तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, ए, फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड संयुगे आढळतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

Rice Water | agrowon

केसासाठी कंडिशनर

शाम्पूने अंघोळ केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने टाळूला मसाज करा. ज्यामुळे जीवनसत्त्व आणि खनिजे केसांच्या मुळापर्यंत पोहोचतात.

Rice Water | agrowon

पचनासाठी उत्तम

तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल किंवा खाण्याची इच्छा होत नसेल तेव्हा तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते.

Rice Water | agrowon

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Rice Water | agrowon