Masoor Import Duty : मसूरच्या आयात धोरणाला केंद्राची मुदतवाढ, शेतकऱ्यांना फटका

Aslam Abdul Shanedivan

शेतकऱ्यांना फटका

देशात मसूरचे उत्पादन घटले आहे. यावर केंद्र सरकार उपाय योजना न आखता आयातीचा सपाटा लावला आहे. सरकारच्या या आयात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Masoor Import Duty | Agrowon

शुल्कमुक्त आयातीचे धोरण

केंद्र सरकारने मसूरची आयात वाढावी यासाठी ३० टक्के शुल्क काढून शुल्कमुक्त आयातीचे धोरण आखले आहे.

Masoor Import Duty | Agrowon

३० टक्के शुल्क

पुर्वी मसूर आयातीवर सरकारने ३० टक्के शुल्क लावला होता. मात्र मार्च २०२४ पर्यंत शुल्कमुक्त आयातीचे धोरण आखल्याने कोणताच शुल्क मसूर आयाती नसेल.

Masoor Import Duty | Agrowon

२०२५ पर्यंत मुदत वाढ

शुल्कमुक्त आयाती धोरणाला सरकारने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मार्च २०२५ पर्यंत आयातीवर कोणतेही शुल्क नसेल.

Masoor Import Duty | Agrowon

कडधान्य उत्पादक अडचणीत

देशात मसूर आयात धोरणामुळे इतर कडधान्याच्या दराला त्याचा फटका बसत आहे. ज्यामुळे देशातील मसूर उत्पादकांना मोठा फटका बसत असून हे धोरण कडधान्य उत्पादकांना अडचण ठरत आहे.

Masoor Import Duty | Agrowon

आयातीचा वाढता आलेख

२०२३-२४ (एप्रिल ते नोव्हेंबर) ११.४८ लाख टन

२०२२-२३ (एप्रिल ते नोव्हेंबर) ८.५८ लाख टन

Masoor Import Duty | Agrowon

आयातीचा परिणाम

- शुल्क काढल्याने मसूर आयातीत ३४ टक्के वाढ

- आयातवाढल्याने मसूरचे भाव कमी झाले

- देशातील मसूर उत्पादक आर्थिक संकटात

- तूर डाळीची १५ ते २० टक्के मागणी मसूरकडे वळाली

- मसूरच्या कमी भावाचा काही प्रमाणात तुरीच्या भावावरही परिणाम होतो

- कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातून मसूरची आयात

- आयातदारांकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागतच

Masoor Import Duty | Agrowon

Chemical Fertilizer Subsidy : रासायनिक खतांच्या अनुदानावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आणखी पाहा