sandeep Shirguppe
ड्रॅगन फ्रुटमध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात.
ड्रॅगन फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात.
सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फळ खाल्ल्यास शरीरास अनेक पोषकघटकांचा पुरवठा होऊ शकतो.
ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्यास शरीर आणि त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो.
सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले जाऊ शकते.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण सकाळच्या वेळेस ड्रॅगन फ्रुट खाऊ शकता.
नियमित रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यास शरीरास लोहाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होण्यास मदत मिळेल.