sandeep Shirguppe
केसांसाठी केमिकल युक्त घटक वापरून केसांचे दिर्घकाळ नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
असे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही केसांसाठी शिकाकाई देखील वापरू शकता. याचे अनेक फायदे आहेत.
शिकाकईमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, डी, ई आणि के असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे स्कॅल्प स्वच्छ करते.
शिकाकई आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्टची टाळूला मसाज करा. अर्ध्या तासानंतर शिककाईची पेस्ट काढून धुवा.
शिकाकाई आणि दह्याच्या पेस्टने नियमीत डोके धुतल्यास केसांना मजबुती मिळेल.
शिकाकाईमध्ये मधाचे मिश्रण करून टाळूला ५ मिनिटे मसाज करा. यापासून कोंडा निघून जाण्यास मदत मिळेल.
शिकाकाई पावडरमध्ये तीन चमचे कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑइल मिसळून डोक्याला लावल्यास केस गळती थांबू शकते.
आम्ही दिलेली माहिती सामान्य असून याबाबत एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.