Aslam Abdul Shanedivan
भोपळ्याच्या बिया खाण्याचे अनेक फायदे असून जे आपले आरोग्य मजबूत करण्यास मदत करतात
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते.
भोपळ्याच्या बिया पोषक आणि आवश्यक घटकांचे स्त्रोत असून त्याचे सेवन केल्यास थकवा आणि अशक्तपणा सारख्या समस्या कमी होतात
भोपळ्यामध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे याच्याने दिवसाची सुरूवात केल्यास पचनसंस्था चांगली राहते.
भोपळ्याच्या बिया अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असून यात कॅरोटीनोइड्स आणि व्हिटॅमिन ए देखील असते. जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते.
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आढळते. जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
भोपळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड आढळते जे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.