sandeep Shirguppe
उन्हाळ्यात गार दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. दूध हे हाडांसाठी आणि स्नायूंसाठी चांगले मानले जाते.
सध्या उन्हाळा वाढल्याने शरिराला थंडावा मिळण्यासाठी गार दूध उपयुक्त ठरते.
उन्हाळ्यात गार दूध प्यायल्याने शरीरातील पाण्याची गरज भागते आणि शरीर हायड्रेटेड राहते.
दुधात कॅल्शियम भरपूर असते, जे हाडांसाठी आणि दांतांसाठी आवश्यक आहे.
दुधात प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जी स्नायू आणि शरीराच्या इतर कार्यांसाठी आवश्यक आहेत.
उन्हाळ्यात गॅस, एसिडिटी आणि जळजळ यासारख्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी गार दूध उपयुक्त आहे.
उन्हाळ्यात सकाळी एक ग्लास गार दूध प्यायल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
गार दूध रक्ताभिसरण सुधारते आणि स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.