sandeep Shirguppe
तुळस चावून खाण्याचे अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकार शक्ती, सर्दी आणि खोकला कमी करण्यास याचा फायदा होतो.
तुळशीत अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
तुळशीची रोज २ पानांचे सेवन केल्यास कफ कमी होतो. खोकला दूर होतो.
तुळशी पचन क्रिया सुधारण्यास मदत करते आणि अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम देते.
तुळशीमध्ये काही गुणधर्म आहेत जे मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि तणाव कमी करतात.
तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात.
तुळशी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
तुळशीमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.