sandeep Shirguppe
नारळ पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. नारळ पाण्याचा सर्वाधिक उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो.
नारळ पाणी हायड्रेटिंग असल्याने शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स पुरवते.
नारळ पाण्यात फायबर असल्याने पचन सुधारण्यास मदत होते.
नारळातील पोटॅशियम सोडियमचा प्रभाव कमी करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते.
नारळ पाणी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यास मदत करते.
नारळ पाणी हे कमी कॅलरीज असलेले पेय आहे, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले नारळ पाणी प्रतिकारशक्ती वाढवते.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्यानी नारळ पाणी नियमितपणे प्यावे.