sandeep Shirguppe
उन्हाळ्यात अती प्रमाणात चहा पिण्याचे तोटे आहेत. चहा आपल्या पचनसंस्थेवर घाला घालतो.
चहामध्ये कॅफिन असल्यामुळे लघवी वाढते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते.
चहामध्ये टॅनिन नावाचे तत्व असल्याने लोह आणि कॅल्शियमचे शोषण रोखते.
बाजारात मिळणाऱ्या चहामध्ये जास्त प्रमाणात साखर असू शकते, ज्यामुळे वजन वाढण्याची भीती राहते.
दिवसातून अनेकवेळा चहा पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपल्याला चहामध्ये असणाऱ्या कॅफिनची सवय लागते.
रिकाम्या पोटी चहा पिल्यास पोट खराब होऊ शकते. पोटावर याचा दिर्घकाळ परिणाम होतो.
चहाच्या सेवनामुळे लठ्ठपणा वाढते, वजन कमी करायचा असेल तर चहा पिण्यावर नियंत्रण ठेवा.
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजच्या आहारातून चहा वगळला पाहिजे.