Aslam Abdul Shanedivan
आधुनिक जीवनशैली आणि कमी वेळ यामुळे अनेक जन आपण नेमकं काय खातोय हे देखील पाहत नाहीत
फास्टफूड आणि जिभेला चव देणारे अनेक प्रकार आपण खातो ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते
यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली असून शक्यतो हे पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे
डब्ल्यूएचओने आपल्या यादीत पास्ता आणि ब्रेड याचा समावेश केला असून यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे टाळावे
आपल्या पैकी बरेच जण बटाट्याचे चिप्स आणि पाम तेलाचा खाण्यात वापर करतात. यातील कॅलरीजमुळे ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून यामुळे हृदयाला मोठी हानी पोहचू शकते.
पिझ्झा आणि बर्गर हे देखील भरपूर लोणी, चीज, मीठ आणि अनेक प्रकारची रसायनिक घटकांपासून बनवले जाते. यामुळे वजन झपाट्याने वाढते.
कोणत्याही परिस्थितीत एका दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे गंभीर आजार होतात.