Mahesh Gaikwad
पृथ्वीवर वन्यजीवांच्या लाखो प्रजाती आहेत. यामध्ये अनेक प्राणी विषारी असतात. साप आणि विंचू हे देखील त्यापैकीच एक आहेत.
सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप आणि विंचू या विषारी जीवांची सर्वाधिक भीती असते. या जीवांच्या विषामुळे जीवाचा धोका असला, तरी यांचे विष खूपच किमती असते.
आज आपण जगातील सर्वात विषारी विंचवाची माहिती पाहणार आहोत. या विंचवाच्या एक थेंब विषाची किंमक लाखो रुपयांमध्ये आहे.
डेथस्टॉकर हा जगातील सर्वात विषारी विंचू समजला जातो. एका रिपोर्टनुसार, याच्या १ मिली विषाची किंमत ८ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
डेथस्टॉकरचे विष किमती असण्याबरोबरच सर्वात विषारी असते. याचे विष काढण्यासाठी याच्या डंकाला विजेचे हलके झटके दिले जातात.
डेथस्टॉकर विंचाचे विष अत्यंत विषारी असल्याने ते काढताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा याच्या विषामुळे जीव जाण्याचा धोका असतो.
हा विंचू प्रामुख्याने उत्तर आफ्रिकेपासून मध्य पूर्वेच्या वाळवंटांमध्ये आढळतो. भारतातही राजस्थानच्या थार वाळवंटामध्ये हा विंचू आढळतो. येथील लोक या विंचवाचे विष काढण्याचे काम करतात.
या विंचवाच्या विषाचा उपयोग कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी केला जातो. तसेच याच्या विषाने ब्रेन ट्यूमरचाही उपचार केला जातो.