Mahesh Gaikwad
आजकाल हवेच्या प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. प्रदुषणामुळे विषारी वायू हवेत मिसळत आहेत.
वातावरणात विषारी वायू मिसळल्याने हवा प्रदुषित होत आहे. परिणामी वाढत्या हवेच्या प्रदुषणामुळे गंभीर आजारांचाही धोका वाढत आहे.ॉ
विषारी हवेपासून पासून वाचण्यासाठी तुम्ही घरात स्वच्छ ऑक्सिजन देणारे इनडोर प्लांट लावू शकता.
या इनडोर प्लांटमुळे घरात भरपूर प्रमाणात स्वच्छ ऑक्सिजन मिळतो. स्नेक प्लांट घरामध्ये ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी उत्तम झाड आहे.
रबराच्या झाडामुळेही घरातील हवेचे प्रदुषण कमी होण्यास मदत होते आणि साफ ऑक्सिजन मिळतो.
घरात शुध्द हवेच्या पुरवठ्यासाठी तुम्ही घरात लहान बांबूची झाडे लावू शकता.
घरात लावल्या जाणारे अजून एक झाड म्हणजे स्पायडर प्लांट. याला एअर प्युरिफायर असेही म्हणतात.
तसेच अनेक घरांच्या बाल्कनीमध्ये आपल्याला मनी प्लांटचा वेल दिसतो. घरांमध्ये लावल्या जाणारा मनी प्लांटमुळे घरातील हवा स्वच्छ होण्यास मदत होते.