Aslam Abdul Shanedivan
आपला देश कृषीप्रधान असून देशभर अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. ज्यात काही कृषीशी निगडीत ही असतात
असाच एक सण महाराष्ट्रातील शेतकरी आजही साजरा करतात. तो म्हणजे वेळ अमावास्या, वेळा अमावास्या किंवा येळवस अमावास्या असेही म्हटले जाते
हा मूळ कर्नाटकी सण असूनही महाराष्ट्रातील नांदेड, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीच्या उर्वरित भागात साजरा केला जातो
पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला 'येळवस' साजरी केली जाते. यासाठी कडब्याच्या खोपीत लक्ष्मीची प्रतिष्ठापना करून शेतातील पांडवांची पूजा केली जाते.
गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सुर्यफूल आदी पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे, अशी देवाकडं प्रार्थना केली जाते. यानंतर भोजनाचा आनंद लुटला जातो.
नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात.
आयुर्वेदानुसार, ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. यामुळे हिवाळ्यात अमावस्येला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांची मेजवानी असते.